नदीवरील बांध

विषण्यतेने  बघत होतो       भिंतीवरच्या खुणा
काळ जाऊन वर्षे लोटली     आठवणी देती पुन्हा
 
बसत होतो नदीकांठी        बालपणीच्या वेळी
पात्र भरुनी वहात होती     गोदावरी त्या काळी 
 
सदैव पूर येउनी तिजला       गावास वेढा पडे 
गांव वेशीच्या घरांना मग     पाण्याचे बसती तडे 
 
चित्र बदलले आज सारे       पात्र लहान होई   
बांध घातला धरणावरी      पाणी अल्पसे येई 
 
खिन्नपणे खूप भटकलो        भोवतालच्या भागी 
चकित झाले मन बघूनी         हिरवळ जागोजागी 
 
इच्छित दिशेने पाणी वाही     बांध घातल्यामुळे 
सारे जीवन प्रफुल्ल करीं        आनंदमय सगळे
 
( कविता )
 
 
 

2 responses to “नदीवरील बांध

  1. पिंगबॅक नदीवरील बांध | बागेतील तारका

  2. पिंगबॅक नदीवरील बांध | जीवनाच्या रगाड्यातून

यावर आपले मत नोंदवा