गुजरातमध्ये बनवण्यात आला पंतप्रधान मोदींचा १५६ ग्रॅम सोन्याचा पुतळा, किंमत ऐकून व्हाल चकित

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) दणदणीत विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गुजरातमधील सुरत शहरातील एका ज्वेलरने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) 156 ग्रॅम सोन्याचा पुतळा (Narendra Modi Statue) बनवला आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी 20 ते 25 जणांच्या टीमने 3 महिने मेहनत घेतली आहे. या मूर्तीची किंमत सुमारे 11 लाख रुपये आहे.

राधिका चेन्स या ज्वेलरी उत्पादक कंपनीचे मालक बसंत बोहरा म्हणाले की, 18-कॅरेट सोन्याने बनवलेल्या मूर्तीचे वजन 156 ग्रॅम आहे. कारण गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेत भाजपने 182 पैकी 156 जागा जिंकल्या होत्या. मोदींचा हा पुतळा विकत घेण्यासाठी अनेक जण स्वारस्य दाखवत आहेत, मात्र ज्वेलर्सने अद्याप ही मुर्ती विकण्याचा निर्णय घेतलेला नाही.

पीएम मोदींचा सोन्याचा पुतळा
बोहरा म्हणाले, “मी नरेंद्र मोदींचा चाहता आहे आणि त्यांचा सन्मान म्हणून काहीतरी करायचे होते. आमच्या कंपनीत ही मूर्ती बनवण्यासाठी सुमारे 20 कारागिरांना सुमारे तीन महिने लागले. मी अंतिम निकालावर समाधानी आहे. मुर्तीची कोणतीही निश्चित किंमत नाही कारण ती सध्या विक्रीसाठी बाहेर काढलेली नाही.”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोन्याचा पुतळा (Narendra Modi Gold Statue) दिसत आहे.  पीएम मोदींचा सोन्याचा पुतळा पाहून लोक सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

पंतप्रधान मोदींचे चित्र असलेली नाणी
पीएम मोदींचा पुतळा बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी इंदूर आणि अहमदाबादमधील काही व्यावसायिकांनी पीएम मोदींच्या मूर्ती बनवल्या आहेत. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पीएम मोदींचे चित्र असलेली सोन्याची नाणीही मोठ्या प्रमाणात विकली गेली. अलीकडेच मेरठ, यूपी येथे आयोजित केलेल्या दागिन्यांच्या प्रदर्शनात अनेक राज्यांतील सराफा व्यापाऱ्यांनी आपले दागिने प्रदर्शित केले. या प्रदर्शनात पंतप्रधान मोदींचे चित्र असलेली नाणी आकर्षणाचे केंद्र ठरली होती.