Headlines

तो डाळभात आणि आईस्क्रीम खातो…; ‘या’ खेळाडूबाबत Virat Kohli ने केला अजब खुलासा

[ad_1]

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. खेळाव्यतिरिक्त, लोकांना ड्रेसिंग सीक्रेट आणि टीम मेंबर्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील जाणून घ्यायचं असतं. दरम्यान टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीने ड्रेसिंग रुमचं मजेदार रहस्य उघड केलंय. टीमचा एक खेळाडू आहे, जो डाळ भातासोबत आइस्क्रीमही खातो. हा खेळाडू असं एकदा नाही तर नेहमी करतो, असंही कोहलीने सांगितलंय.

विराट कोहलीने सांगितलं रहस्य

विराट कोहलीने त्याच्या ‘वन 8 कम्युन’ या नवीन उपक्रमाच्या प्रमोशनसाठी यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याचा टीममेट रिद्धिमान साहाच्या खाण्याच्या सवयींबद्दल सांगितलं. विराट म्हणाला, ‘आतापर्यंत मी एखाद्याला अनोखं कॉम्बिनेशन असलेलं फूड खाताना पाहिलंय, त्याचं नाव ऋद्धिमान साहा आहे. त्याची खाण्याची शैली खूप मनोरंजक आहे. इतर कोणीही खात नाही अशा गोष्टी तो खातो.’

‘डाळ भातासोबत आइस्क्रीमचं कॉकटेल’

कोहली म्हणाला, ‘एकदा मी त्याला जेवताना पाहिले होते. त्याच्या ताटात बटर चिकन, रोटी, कोशिंबीर आणि रसगुल्ला ठेवला होता. तो ब्रेड आणि सॅलडचे 2-3 तुकडे खातो. सोबतच अख्खा रसगुल्ल्यासोबत तो रोटी देखील खातो. 

कोहली म्हणतो, मी त्याला विचारलं, रिद्धी, तू काय करतोस? यावर त्याने मी असंच खातो हे उत्तर दिलंय. एकदा मी त्याला डाळा भातासोबत आईस्क्रीम खाताना पाहिलं. तो डाळ भाताचा एक घास घेतो आणि त्यानंतर आईसक्रीमचा एक घास असं करत जेवतो.

विराटची फेवरेट डिश 

विराटला राजौरी गार्डनचे छोले भटुरे (virat kohli favourite chole bhature) खुप आवडतात. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्याने रामच्या छोले भटुऱ्याची आठवण काढली होती (virat kohli delhi wale chole bhature). अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्डकप आधी विराटला छोले भटुऱ्याची आठवण येत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *