सतिश मवाळ
प्रतिनिधि मेहकर
आज व मेहकर तालुक्यातील हिवरखेड माळखेड वरदडा चिखली तालुक्यातील ,आमखेड,अंबाशी शिवारामध्ये ढगफुटी व अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते.आज शेतकऱ्यांच्या बांधावर भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांनी जाऊन भेट घेवून धीर दिला.
येथील नदीकाठची दोन्हीबाजूची पेरलेली शेते खरडून गेली. शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील माती वाहून गेली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बळीराजाचे नुकसान झाले आहे. तसेच आमखेड येथील तलाव प्रचंड पावसामुळे फुटला होता त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
नुकसान झालेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात सूचना केल्या.
त्यावेळी मेहकर तहसीलदार संजय गरकल चिखली तहसीलदार अजित कुमार येळे
मेहकर तालुका कृषी अधिकारी काळे चिखली तालुका कृषी अधिकारी शिंदे मेहकर
मंडळ अधिकारी साळवे
चिखली मंडळ अधिकारी गजानन जाधव
मेहकर कॄषी साह्यक सोळंकी तलाठी सरपंच ग्रामसेवक अधिकारी कर्मचारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.