जळगाव : जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून गटबाजी उफाळून आली आहे. प्रा.शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक, तर माजी लोकनियुक्त सरपंच भाविनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुसरे पॅनल अशी लढत रंगणार आहे. विशेष म्हणजे भाविनी पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी.आर.पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांचे मोहाडी हे सासर आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाविनी पाटील यांनी भाजप प्रणीत पॅनलच्या माध्यमातून लढवून लोकनियुक्त सरपंचपदी विजयी झाल्या. यंदा चुरस वाढली असून जाेरदार तयारी सुरू झाली आहे.