कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : भारती मैंद पतसंस्थेतर्फे स्पर्धेचे आयोजन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थे तर्फे यंदा पुसद शहर हद्दीतील उत्कृष्ठ गणेश मंडळांना बक्षीस देऊन गौरव करण्याचे हेतूने स्पर्धा आयोजित केली आहे.पुसद शहर हद्दीतील सर्व नोंदणीकृत गणेश मंडळांसाठी भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे या वर्षी पासून उत्कृष्ट मूर्ती, गणेश मंडळांनी 10 दिवसात राबिविलेले उत्कृष्ट सामाजिक उपक्रम व गणरायांना निरोप देताना काढल्या जाणारी शिस्तबद्ध मिरवणूक या 3 श्रेणी साठी स्पर्धा आयोजित केली आहे.
प्रत्येक श्रेणीत 15 हजार रु ,11 हजार रु व 7हजार रु असे एकूण 9 बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र तसेच सहभागी सर्व मंडळांना प्रशस्ती पत्र दिले जाणार आहे. निवड समितीतील सदस्य शहरातील गणेश मंडळाला भेटी देऊन सर्व माहिती घेतील.तसेच गणरायाचा फोटो व व्हिडीओ शूटिंग काढले जाणार आहे. 9 तारखेपर्यंत प्रत्यक्ष मंडळात पाहणी तर 10 तारखेला विसर्जन मिरवणुकीत परीक्षण केले जाईल.निवड समिती प्रमुख ललित सेता, सदस्य गजानन मोगरे , स्वप्नील चिंतामणी, अमोल ताजनेकर, निलेश राजुलवार यांची टीम स्पर्धेच्या परीक्षण हेतूने मंडळांना भेट देण्यासाठी येत असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष एड. आप्पाराव मैंद, सामाजिक उपक्रम समिती अध्यक्ष शरद मैंद, उपाध्यक्ष एड भारत जाधव, सर्व संचालक मंडळ तथा सामाजिक उपक्रम समिती सदस्यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्या मंडळांची नावे बक्षीस वितरणाचे दिवशीच जाहीर केले जाईल.