मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. राजकीय आंदोलनप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर आज न्यायालयाने बच्चू कडू यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना आता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्याच्या संघटनेने केला होता. मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालायतील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलन केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सूरूच राहिल असा इशारा देखील त्यांनी दिला होता.
“हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक
याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित यांच्यावर दबाव आणत होते. असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काॅंग्रेसचे सदस्य सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले होते.
Read also
- “लक्षात ठेवा…! राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे”; तुषार भोसले
- “माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर
- सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस
- शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भुंकप..! माजी मुख्यमंत्र्यांसह काॅंग्रेसचे 8 आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
- “राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं