पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सवांद यात्रेत मनसेवर जोरदार टिका केली. त्याचबरोबर त्यांनी लग्नाचा विधी, कन्यादान यांवरून ब्राम्हण हिंदूविषयी वादग्रस्त व्यक्तव्य देखील त्यांनी केलं. याचाच निषेध म्हणून आज ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादी काॅंग्रेसविरोधात जोरदार हल्लाबोल आंदोलन केलं. याचाच धागा पकडत भाजप आमदार राम सातपुते यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेने दिलेले चॅलेंज राणा दाम्पत्य पुर्ण करणार? कार्यकर्त्यांशी प्रंचड गर्दी होण्याची शक्यता
राम सातपुते यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, अमोल मिटकरी तोंडाला लकवा झाल्यासारखं वाकड तिकडं तोंड करून कायम हिंदू परंपरांचा अपमान करायचा. तुझा उद्योग तात्काळ थांबव. हिंदूंच्या धार्मिक मंत्रोउच्चाराची टिंगल करून स्वतःची विकृती दाखवू नकोस. तुझा सत्तेचा माज भविष्यात जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. थोडं थांब असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
तसेच हनुमान चालिसा भोंग्यावर लावणाऱ्यांना स्वत:ला तरी हनुमान चालीसा येते का? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना केला आहे. पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात. चांगला टाईमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय डोकं आणि त्यात मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं. असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यांवर मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे, तर हिंदू महासंघाने अमोल मिटकरी यांच्या विरोधात पुण्यात जोरदार आंदोलन करीत अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी संपुर्ण ब्राम्हण समाजाची माफी मागावी असं देखील आंदोलक ब्राम्हण महासंघाने म्हटलं आहे.
Read also:
- ..अन् अजित पवार भाजप नेते लक्ष्मण जगतापसाठी धावले रूग्णालयात! राज्यभरात एकच चर्चा
- “राज ठाकरे त्यांच्यासोबत होते, तेव्हा गुलुगुलु अन् आता खाजवायाला लागले”; फडणवीसांचा हल्लाबोल
- “अरे धनु बाळा, थांबल्या का तुझ्या छातीतील कळा”; वंसत मोरेंचा धनंजय मुंडेंला टोला
- “मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत..;” रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
- “राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटणकरींनी जरा संभाळून”; मनसेचा राष्ट्रवादीला इशारा