मुंबई : मुंबै बँकेची चौकशी लावल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी संतापून ‘आता माझा एककलमी कार्यक्रम हा घोटाळे बाहेर काढण्याचा असणार आहे’, असं म्हटलं. दरेकरांच्या या इशाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं. ‘जर पुरावे असतील तर खुशाल तक्रार करावी. सरकारच्या आदेशाने चौकशी यंत्रणा चौकशी करतील. त्यातून पुढे जे निष्पन्न व्हायचं ते होईल’, असं म्हणत अजित पवारांनी प्रवीण दरेकर यांचं आव्हान परतावून लावलं आहे.
मी कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही, सोमय्या विनाकारण प्रतिमा मलिन करतायतं – अनिल परब
अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एमपीएससी, सैन्य भरती, ओबीसी आरक्षण, मुंबै बँक चौकशी यासह आदी विषयांवर अजित पवारांनी आपली रोखठोक मतं मांडली. तसंच विरोधकांच्या आरोपांना जशास तशी उत्तरही दिली. पुणे जिल्हा बँकेत महाभ्रष्टाचार आहे. त्याची तक्रार ईडी, सीबीआय आणि केेंद्र सरकारकडे करणार असल्याचं विधान दरेकरांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केलं. तसंच राज्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बँकांच्या देशील तक्रारी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं दरेकर म्हणाले. दरेकरांच्या प्रश्नांवर अजितदादांनी रोखठोक उत्तर दिली.
अजित पवार म्हणाले, “प्रत्येक संस्थेबद्दल कुणाचं काही मत असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांच्या वेगवेगळ्या विभागामार्फत चौकशी करु शकते. कुणाला काही वाटत असेल, काही माहिती असेल तर तर त्यांनी संबंधितांकडे तक्रार करावी. तक्रारीची चौकशी केली जाईल. तक्रारीत तथ्य असेल तर संबंधितांवर अॅक्शन घेण्यात येईल, जर तथ्य नसेल तर तक्रारीत तथ्य नाही, असं सांगण्यात येईल.”
सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी; चंद्रकात पाटलांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
किरीट सोमय्या कारखान्यांचा विषय काढतात, वेगवेगळे आरोप करतायत. तर प्रवीण दरेकर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बँकेच्या भ्रष्टाचारावर बोलतात. भाजपला काय इशारे द्यायचेत?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवारांनी खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, “हे नेमकं काय चाललंय, राजकारण आहे की नाही हे मीडियाने ठरवायचं. काहींची सत्ता येत असते, काहींची जात असते. पण सध्या राजकारणाला उगीच उत आलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ज्याचा त्याचा राजकारणाचा तो भाग असतो”.
Read Also :
- मुंबै बँकेत घोटाळा: अजित पवारांच्या जवळचे ६ संचालक सामील – प्रवीण दरेकांचा दावा
- किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘मास्टरप्लॅन’; भाजपच्या मुसक्या आवळणार?
- मुख्यमंत्री आणि पवार घराणं फक्त स्वत:च्याच मुलांचं करिअर घडवतात – विक्रांत पाटील
- रोहित पवारांचा भाजपला दे धक्का: अजितदादांच्या उपस्थितीत कर्जतच्या मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
- महापालिका रणधुमाळी: नाशिकमध्ये 40 प्रभाग तीन सदस्यांचे, एक 2 सदस्यांचा, शिवसेनेत नाराजीचा सुर