कोल्हापूर : गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर, पुन्हा एकदा सत्तेतील भाजप आणि राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीच्यात यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटनाक्रमांनंतर आता मराठा आरक्षणप्रश्नी भाजप खासदार संभाजीराजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.
आगामी निवडणुकीत युती की महाविकास आघाडी? शरद पवारांनी आढावा बैठकीत केले चित्र स्पष्ट
मराठा आरक्षणाचा जटिल प्रश्न राष्ट्रपतींच्या समोर मांडून, मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुवार, २ सप्टेंबरला ही भेट होणार आहे. या भेटीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आता सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळही यावेळी त्यांच्यासोबत जाणार आहे.
जयंत पाटलांनी फिल्डिंग लावली, सांगलीत होणार भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’
या सर्वपक्षीय शिष्टमंडळात राज्यतून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व काँग्रेसकडून राज्यातील आमदार संग्राम थोपटे हे पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या सोबत असणार आहेत. दुसरीकडे केंद्रांने नुकतीच १२७ वी घटनादुरुस्ती केली आहे. त्यामुळे, नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना दिला गेला आहे. या पार्श्वभूमीवर आता या मंडळाकडून राष्ट्रपतींकडे काय मागण्या केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Read Also :
- “राष्ट्रपतींनी राज्यपालांची चौकशी करावी, त्यांच्यामुळे राष्ट्राला व संविधानाला धोका”- बच्चू कडू
- भुजबळांच्या ‘त्या’ इमारतीचे खरे मालक सांगा! मुख्यमंत्री आणि शरद पवारांना सोमैय्यांचे चॅलेंज
- महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी? दिलीप मोहिते-पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर
- “…तर देशात लसीकरण शक्य नसतं आणि देश कायमच्या लॉकडाऊनमध्ये गेला असता” – फडणवीस
- राणे-सेना वादानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ, घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप!