बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा सवाल राजू पाटील यांनी ट्विट करत केला आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजू पाटील यांनी ट्विट करत हा सवाल विचारला असून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरात लवकर लोकलसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 51 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 83,198 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढत असताना महाराष्ट्रातही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. याच दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे.