इम्तियाज जलील हे सातत्याने परिस्थिती बिघडवत आहेत. पोलिसांनी इम्तियाज जलील यांची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यापूर्वी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली.तसेच मशिदकडे येणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे.
“निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन हा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा आरोप चुकीचा आहे. असं असेल तर पुढचे चार वर्ष निवडणूकच घेऊ नका,” अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली. ‘ इम्तियाज जलील यांनी आतापर्यंत जेवढ्या वेळा परिस्थिती बिघडवली त्याची माहिती काढण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा,” असेही चंद्रकांत खैरे म्हणाले