आरोग्यानामा ऑनलाईन टीम : वजन कमी करण्यासाठी तसेच आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकजण ग्रीन टी नियमित पितात. ग्रीन टी घेण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी, झोप चांगली लागण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त आहे. परंतु, ग्रीन टी घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, या गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१ ग्रीन टी बनवताना कधीही दूध टाकू नका.
२ तुळस, लिंबू, पुदीना, जॅस्मिन असे विविध प्रकार ग्रीन टी चे असून तुम्ही कशासाठी सेवन करत आहात याचा विचार करा.
३ वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी घेणार असल्यास दिवसातून किती वेळा घ्यावी याबद्दल डॉक्टरांकडून सल्ला घ्या.
४ ग्रीन टी वारंवार उकळू नका. बनवल्यानंतर लगेचच सेवन करा.
५ ग्रीन टीमध्ये साखर किंवा गूळ टाकल्याने यातील पोषक तत्वे कमी होतात. त्यामुळे असे करू नका.
Visit : arogyanama.com