आरोग्यनामा टीम- जर तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमचं बटाट्यावरील प्रेम थोडं कमी करावं लागेल. तज्ज्ञ सांगतात की, आठवड्यातून 4 पेक्षा जास्त वेळा बटाटा खाऊ नये. तसे केल्यास घातक ठरू शकतं. जाणून घेऊयात यामागील कारण.
बटाट्यात प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी खनिज तत्व आणि कार्बोहायड्रेट असतात. याशिवाय यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी असतं. याशिवायत यात फॅट्सही अधिक असतात. बटाटा तुमचं वजन वाढवतो म्हणून याचं सेवन कमी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जास्त प्रमाणात जर याचं सेवन केलं तर डायबिटीजसोबतच आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या येऊ शकतात. परंतु काही लोक असे आहेत ज्यांनी आवर्जून बटाच्याचं सेवन टाळायला हवं. त्या कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊयात.
कुणी खाऊ नये बटाटा ?
1) डायबिटीजग्रस्त – ज्यांना शुगर आहे अशा लोकांसाठी बटाटा खाणं खूप नुकसानदायी आहे. साखर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर तुम्हाला बटाट्याचं सेवनही नियंत्रणात करावं लागतं. बटाट्यात असणाऱ्या ग्लायसेमिक इंडेक्समुळं शरीरात ग्लुकोजचं प्रमाण वाढतं.
2) ॲसिडीटीमध्ये नुकसानदायी – बटाट्याच्या सेवनानं गॅसची समस्या वाढते. यामुळं अनेकांना गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या इतर समस्यांचा सामना करावा लागतो. जर गॅसची समस्या असेल तर बटाटा खाणं कमी करायला हवं.
3) ब्लड प्रेशर – बटाट्याच्या जास्त सेवनाचा ब्लड प्रेशरवर देखील प्रभाव पडतो. यामुळं हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. एका रिसर्चनुसार आठवड्यातून चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा बटाटा खाल्ल्यानं हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. म्हणून बटाट्याचं सेवन कमी करायला हवं.
4) वजन वाढवतो बटाटा – ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी बटाटा फादेशीर आहे. परंतु जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर बटाटा खाणं कमी करा. कारण याच्या सेवनानं फॅट्स आणि कॅलरीज वाढतात.