आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्वाइन फ्लू या आजाराने आतापर्यंत अनेक बळी घेतले आहेत. अजूनही हा आजार सर्वत्र आढळून येत असल्याने प्रत्येकाने योग्य ती काळजी घेणे खुप आवश्यक आहे. यावर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. यासाठी त्याचे संकेत माहिती असणे गरजेचे आहे. तसेच घरच्या घरीच काही उपाय केले तर या आजारापासून बचाव सुद्धा होऊ शकतो. स्वाइन फ्लू चे संकेत आणि उपाय जाणून घेवूयात.
हे आहेत संकेत
* श्वास घेण्यास त्रास होणे
* भूक न लागणे
* सतत सर्दी-पडसे होणे
* घशात जळजळ आणि वेदना
* उलटी किंवा डायरिया
करा हे उपाय
१) रोज सकाळी तुळशीची पाने खा. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि संसर्गापासून बचाव होतो.
२) आवळा ज्यूसमधील व्हिटॅमिन-सी स्वाइन फ्लूपासून बचाव करते.
३) हळदीत करक्युमिन असते. हे स्वाइन फ्लूपासून बचाव करते.
४) कापराचे लहान लहान तुकडे बटाटा किंवा केळीसोबत मिसळून खा. हे महिन्यातून एकदाच घ्या.
५) रोज सकाळी एक ग्लास प्या.
६) रोज कडूलिंबाची तीन-चार पान खा.
७) विलायची, तुळस आणि कापूर बारीक करून मिसळा. या मिश्रणाचा दिवसातून चार-पाच वेळा सुगंध घेत राहा.
८) रोज उपाशीपोटी दोन लसणाच्या पाकळ्या खा.
९) रोज एक ग्लास हळदीचे दूध घ्या.
१०) अॅलोवेरा ज्यूस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.