IMPIMP

…म्हणून सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलावली काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक, बाळासाहेब थोरात सांगणार महाराष्ट्रातील स्थिती

by pranjalishirish
congress president sonia gandhi meeting to review the coronavirus situation in the country

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्या अपेक्षित अशी आटोक्यात येत नाही. त्यामुळे आता याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी  Sonia Gandhi यांनी बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार असून, यामध्ये काँग्रेसशासित राज्यांसह देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

अनैतिक संबंधातून पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी, कोरोनानं मृत्यू झाल्याचं सांगितलं, पण झाला पर्दाफाश

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. अनेक निर्बंधही लावण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. कोरोना परिस्थितीवर गंभीरपणे लक्ष देत सोनिया गांधी Sonia Gandhi  आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रातून काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

Lockdown च्या विरोधात उदयनराजेंचे साताऱ्यात ‘भीक मांगो’ आंदोलन

दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती, उपाययोजना आणि लसींचा पुरवठा यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब थोरात हे राज्यामध्ये निर्माण झालेल्या लसीचा मुद्दा ते या बैठकीत मांडतील, अशी माहिती आहे.

Read More : 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

Related Posts