IMPIMP

घरचा आहेर देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यानंच केलं ‘असं’ आवाहन, म्हणाले – ‘… तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा’

by pranjalishirish
Ajit Pawar | Ajit Pawar told the officials; Said - 'You don't give me any reason, just work at my speed'

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावं अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील या मुद्द्यावरील धुसफूस आता समोर येताना दिसत आहे. अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी या मुद्द्यावरून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. त्यांनी सरकारवरच ताशेरे ओढले आहेत. या मुद्द्यावरून बोलताना नितीन राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

‘अपेक्षित न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन करा, कोणताही अन्याय सहन करू नका’

नितीन राऊत Nitin Raut  म्हणाले, आपलं सरकार असतानाही अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांवर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा. अपेक्षित न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन करा. कोणताही अन्याय सहन करू नका असं ते म्हणाले. इतकंच नाही तर मागासवर्गीयांच्या या हक्कांसाठी स्वत: देखील या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. एका बैठकीत बोलत असताना त्यांनी याबाबत भाष्य केलं.

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

‘रस्त्यावर उतरून प्रत्येक जिल्ह्यात लढा उभारणार नाही तोवर आपल्याला न्याय मिळणार नाही’

नितीन राऊत Nitin Raut  म्हणाले, प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांनी पदोन्नतीतील आरक्षण, नोकऱ्यातील अनुशेष असो की अन्य विषय, एससी, एसटी आणि मागासांना ते मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मराठा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो आणि त्याचे पडसाद मंत्रिमंडळात उमटतात. मात्र एकेकाळी आपल्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरणाऱ्या वंचित शोषित समाजानं आता रस्त्यावर उतरून लढणं बंद केलं आहे. रस्त्यावर उतरून जोवर प्रत्येक जिल्ह्यात लढा उभारणार नाही तोवर आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात ठेवा असंही राऊत यांनी बैठकीत उपस्थित असणाऱ्यांना सांगितलं.

गृहमंत्री देशमुख यांच्यावरील कथित आरोप प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल, चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमण्याची मागणी

सरकारच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन प्रयत्न करेन’

पुढं बोलताना नितीन राऊत Nitin Raut म्हणतात, विधीमंडळ समितीनं पदोन्नतीत आरक्षण, नोकऱ्यातील अनुशेष निर्मुलन, सामाजिक न्यायाच्या विविध योजना यांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यायला हवा. दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना जवळपास गुंडाळण्यात आली. रमाई घरकूल मध्ये देखील खूप कमी खर्च होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन प्रयत्न करेन असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलताना दिलं.

‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका

पदोन्नती आरक्षण विषयावरील उपसमितीवर अजित पवार का ?

नितीन राऊत असंही म्हणाले की, ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्री उपसमिती बनते. त्याच्या अध्यक्षपदी ओबीसी मंत्र्याला नियुक्त केलं जातं. मराठा आरक्षण विषयावर उपसमितीच्या अध्यक्षपदी मराठा मंत्र्याची वर्णी लागते. परंतु पदोन्नती आरक्षण विषयावरील उपसमितीचे अध्यक्ष दलित मागासमधील मंत्र्यास न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलं जातं. असं का ? असा सवालही राऊत यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

Aslo Read : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

Phone Tapping : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मौन का बाळगलंय? संजय राऊतांनी केले स्पष्ट

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले-‘संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी…’

Related Posts