16 वर्षीय शेफाली वर्मा बनली जगातील नंबर 1 महिला फलंदाज, बनवलं ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी महिला टी – 20 वर्ल्ड कप मध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या शेफाली वर्माने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. ती आता जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरली आहे. शेफालीने आयसीसीच्या महिला टी – 20 रॅकिंगमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. ती भारतातील अशी दुसरी खेळाडू आहे जी या स्थानावर पोहोचली आहे. तिच्यापूर्वी फक्त मिताली राज या क्रमांकावर पोहोचली होती.

शेफाली वर्माने महिला टी – 20 वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त 161 धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट 161.00 आहे. शेफालीने टूर्नामेंटमध्ये सर्वात अधिक म्हणजे 9 षटकार लगावले आहेत. ती सर्वात कमी वयात क्रमांक 1 ची खेळाडू बनल्याने हा ही विक्रम तिच्या नावे झाला आहे.

शेफाली वर्माने न्यूझीलँडच्या सूजी बेट्सला मागे सोडून महिला टी – 20 रॅकिंगममध्ये पहिले स्थान पटकवले. सूजी बेट्स ऑक्टोबर 2018 मध्ये पहिल्या क्रमांकावर होती. बेट्सने टी – 20 वर्ल्ड कपमध्ये चार सामन्यात 48 धावा केल्या, तिचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचू शकला नव्हता.

शेफाली वर्माच्या ओपनिंग पार्टनर स्मृती मंधाना आणि जेमिमाह रोड्रिगेज यांचे स्थान दोन दोन ने कमी झाले आहे. मंधाना 6 व्या स्थानी आहे तर रोड्रिगेज सातव्या स्थानावरुन 9 व्या स्थानी आली आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर 12 व्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडची गोलंदाज सौफी एक्सेल्सटन महिला टी – 20 रॅंकिंगमध्ये पहिल्या क्रमांकार आहे. तिने महिला टी – 20 वर्ल्ड कपमध्ये 4 सामन्यात 8 विकेट घेतल्या. भारताची लेग स्पिनर पूनम यादव चौथ्या स्थानावरुन 8 व्या स्थानावर घसली आहे. दिप्ती शर्मा आणि राधा यादव क्रमश पाचव्या आणि सातव्या स्थानी आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये सेमी फायनल दरम्यान सोफी आणि शेफालीमध्ये चांगला सामना पाहायला मिळाला होता.