मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, आई-वडिलांनी लहान मुलासह केली आत्महत्या

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – घरातील तरुण मुलगी प्रियकरासोबत पळून गेली आणि त्याचा जबर धक्का तिच्या आई – वडिलांना बसला. ही घटना गडचिरोली येथील असून मुलगी पळून जाताच आई – वडिलांनी लहान मुलासह घरामागील असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.

रवींद्र, वय (५२) वैशाली (४६) आणि साहिल (१९) अशी आहेत. हे कुटुंब मूळचे अमिर्झा गावचे असून काही वर्षांपासून ते गडचिरोलीतील आनंदनगर येतजे राहत होते. पोलिसांनी ही आत्महत्या मानसिक धक्क्यामुळे केली असावी असा प्राथमिक अंदाज बांधला आहे.

कॉन्व्हेंट शाळेत शिक्षिका असल्यामुळे आपण प्रेमविवाह करणार असल्याची त्या मुलीने दिड महिन्यापूर्वी सांगितले होते. पण घरातील विरोधामुळे ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली.