पाकच्या सुप्रीम कोर्टानं सेनाप्रमुखाचा ‘कार्यकाळ’ वाढविण्याबाबत दिला ‘इशारा’, इम्रान खाननं बोलावलं संसदेचे ‘विशेष’ अधिवेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सैन्य कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक सादर करू शकतात. यापूर्वी पीएम इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळानेही कार्यकाळ वाढविण्यासाठी विधेयक मंजूर केले होते. विशेष म्हणजे जनरल बाजवा यांचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढविण्यात आला होता. या निर्णयाबाबत इम्रान सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा इशारा देखील मिळाला होता. जनरल बाजवाच्या मुदतवाढीसाठी सैन्य कायद्यात कोणतीही तरतूद नसल्याचे कोर्टाने म्हटले होते. कोर्टाने या मुदतवाढीस सहा महिन्यांपर्यंत स्थगिती दिली होती आणि सरकारला सहा महिन्यांत संसदेत कायदा करण्यास सांगितले.

एका वृत्तपत्रानुसार पीएम इम्रान यांनी बुधवारी संविधान आणि सैन्य कायद्यातील प्रस्तावित केलेल्या दुरुस्तींना मान्यता देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीची अध्यक्षता केली. या विषयावर विरोधकांशी सहमती झाल्यानंतर इम्रान सरकारही शुक्रवारी संसदेत एक दुरुस्ती विधेयक सादर करेल. यावर्षी जनरल बाजवा ६० वर्षांचे होणार आहेत.

इम्रान खान यांनी ऑगस्टमध्ये बाजवा यांचा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय घेतला होता
बुधवारी बैठकीला आलेल्या मंत्रिमंडळाच्या एका सदस्याने सांगितले की, मुदतवाढीच्या संदर्भात सैन्य प्रमुखांची जास्तीत जास्त वयोमर्यादा ६४ वर्षे करण्याचे आवाहन केले आहे. तथापि, सेना प्रमुखांची नियमित वयोमर्यादा ही ६० वर्षे असणार आहे. ते म्हणाले की बाजवाच्या मुदतवाढीसंदर्भात अंतिम निर्णय पंतप्रधानांद्वारा घेण्यात येईल. पंतप्रधान इम्रान खान यांनी १९ ऑगस्ट २०१९ रोजी बाजवा यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

जनरल बाजवा यांच्या विस्ताराला देण्यात आले आव्हान
पाकिस्तान सरकारकडून जनरल बाजवाच्या विस्ताराला आव्हान देण्यात आले. घटनेच्या कलम २४३ (४) (बी) च्या विरोधात याचा विचार केला गेला. हे प्रकरण सुरुवातीला ज्युरिस्ट फाउंडेशनद्वारा दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांनी कोर्टाला हा खटला मागे घेण्यास सांगितले, त्यानंतर स्वत: कोर्टाने या प्रकरणी सुनवाईचा निर्णय घेतला.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/