रंगभूमिचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक श्रीराम लागू यांचे पुण्यात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांचा जन्म सातारा येथे 16 नोव्हेंबर 1927 मध्ये झाला होता. त्यांनी 1972 पासून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांचे नटसम्राट हे नाटक खूप गाजले होते. नटसम्राट नाटकात त्यांनी साकारलेली गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका खूप गाजली आणि ती त्यांनी अनेक वर्षे रंगवली होती.

श्रीराम बाळकृष्ण लागू (वय-92) यांचे आज मंगळवारी (दि.17) रात्री सव्वानऊच्या  सुरमारास राहत्या घरात निधन झाले. त्यांचे पार्थीव दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यांचे नातेवाईक परदेशातून आल्यानंतर गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे.  त्यांच्या निधनाने मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात तनवीर पुरस्कार सोहळा पार पडला होता. त्याची सुरुवात श्रीराम लागू यांनीच केली होती. या सोहळ्यात त्यांनी सहभाग घेतला होता. हाच सार्वजनीक कार्य़क्रम त्यांचा अखेरचा ठरला.

श्रीराम लागू यांचे प्रथमिक शिक्षण भावे हायस्कूल मध्ये झाले. पुढील शिक्षण त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात झाले. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरु केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/