पेट्रोल पंपाचा मालक बनुन लाखो रूपये कमाई करण्याची ‘संधी’, 22 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही पेट्रोल पंप सुरु करून चांगला नफा कमवायच्या विचारात असाल तर तुम्हाला एका उत्तम संधी आहे. नोएडा डेवलपमेंट अथॉरिटीने पेट्रोल पंपांसाठी लागणाऱ्या जागेची बोली सुरु केली जाणार आहे. आजपासून हि योजना सुरू झाली असून 22 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.

22 नोव्हेंबरपर्यंत करू शकता अर्ज
या लिलावामध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही 22 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकता. या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करून पैसे जमा करू शकता. त्यानंतर 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

अशाप्रकारे व्हा सहभागी
या लिलावप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला https://property.etender.sbi/SBI/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करून पैसे भरू शकता. सेक्टर 47, 50, 69, 72, 105, 108, 122, 137, 143B, 155, 159 आणि 168 या एकूण 14 प्लॉटसाठी लिलाव प्रक्रिया होणार आहे.

या आहेत अटी
नोएडा अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही यामधून माघार देखील घेऊ शकता. तसेच लिलावामध्ये ते उच्च बोलिला नाकारू देखील शकतात.

पंप खोलण्यासाठी महत्वाची माहिती

1) पेट्रोल पंप घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. यासाठी तुमचे वय हे 21 ते 60 वर्षांच्या मध्ये असावे. त्यासच कमीतकमी 10 वी शिक्षण झालेले असावे.

2) जाहिरातीमध्ये असणाऱ्या अटींची आणि शर्तींची पूर्तता करणारा कोणताही व्यक्ती या लिलावासाठी अर्ज करू शकतो. या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

3) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जमीन असायला हवी. कमीतकमी 1200 ते 1600 वर्गमीटर जमीन असणे आवश्यक आहे. जर तुमच्या नावावर जमीन नसेल तर तुम्ही भाड्याने घेतलेल्या जमिनीचा करार तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

4) कुटुंबातील कोना सदस्याच्या नावावर जमीन असेल तरीदेखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी त्यांना जमीन दाखवणे बंधनकारक आहे.

5) जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील आणि स्वतःची जमीन नसेल तरीदेखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराकडे रक्कम असण्याची अट रद्द करण्यात आली आहे.

6) त्याचबरोबर जमिनीच्या मालकीसंदर्भात देखील सूट देण्यात आली आहे. शहरी भागातील अर्जदारासाठी 25 लाख रुपये डिपॉझिट तर ग्रामीण भागासाठी 12 लाख रुपये डिपॉझिट गरजेचे आहे.

Visit : Policenama.com