नीरा नदीला महापुर, ‘लोणंद-सासवड’ रोड बंद (व्हिडिओ)

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे वीर धरणात मोठया प्रमाणात पाण्याची आवक होत असुन शनिवारी सांयकाळी ५ वाजता वीर धरणाला असणाऱ्या एकुण ९ दरवाज्यातुन ४१८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदी मध्ये करण्यात आला. वीर धरण सुमारे ९४ टकके भरले आहे, अशी माहिती वीर धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली. दरम्यान, नीरा नदीमध्ये प्रथमच पाण्याचा एवढया मोठया प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आल्याने नीरा नदीला महापुर येऊन लोणंद -सासवड रोडवर असणारा नीरा नदीवरील पुल व लोणंद -नीरा रोडवर असणारा नदीवरील जुनापुल पाण्याखाली गेला आहे, तसेच नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गत ८- १o दिवसापासुन वीर, भाटघर, नीरादेवघर, गुंजवणी या नीरा खोऱ्यातील या तीन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असुन या पाऊसामुळे ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. वीर धरणात सुमारे ९४.२६ टक्के पाणीसाठा झाला असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे २९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भाटघर धरण ९३.८ टक्के भरले असुन या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आजवर ७६१ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे.

नीरादेवघर धरण ९८.३०टक्के भरले असुन या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १८७९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गुंजवणी हे धरण ९९.३४ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १८७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी वीर धरणामध्ये मोठया प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने वीर धरणातुन सकाळी १० वाजता वीर धरणातुन २२५४० क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. मात्र दुपारी यामध्ये वाढ करून ३१५२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला, मात्र धरणात येणारा साठा नियंत्रण करण्यासाठी सांयकाळी ५ वाजता वीर धरणाला असणारे सर्वच्या सर्व ९ दरवाजे उघडुन ४१८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदी मध्ये करण्यात येत असुन प्रथमच एवढया मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने नीरा नदीला महापुर येऊन लोणंद – सासवड रोडवर वीर धरणासमोर असणारा पुल पाण्याखाली जाऊन या मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे. तसेच लोणंद -नीरा रोडवर असणारा नदीवरील जुना पुल पाण्याखाली गेला आहे, तसेच पाडेगाव ता खंडाळा येथील नीरा दत्ताघाटवर असणारे दत्तमंदीर देखील नीरा नदीच्या पाण्यात पुर्ण बुडाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –