Pune Crime News | टेम्पो-पिकअपची समोरासमोर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील कल्याण – नगर महामार्गावर टेम्पो आणि पिकअप यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाजवळ हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Pune Crime News)

काय घडले नेमके?

आज सकाळी नगरच्या दिशेने येणाऱ्या पिकअप गाडीला टेम्पोची जोरात धडक बसली. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने थेट पिकअप गाडीला धडकधडक दिली. या अपघातामध्ये पिकअप मधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन्ही वाहनांचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.

आज पहाटेच्या वेळी हा भीषण अपघात झाला आहे. यामुळे जखमींना उपचार मिळायला उशीर झाला त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात
दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये नक्की कोणाची चूक होती याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title :- Pune Crime News | two died horrific accident tempo pickup on the kalyan nagar highway