Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रकृती बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना; शहा, नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रकृती बिघडल्याने त्यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी शिंदे यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आजच्या सुनावणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) हे आपले सर्व कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लांबवणीवर पडल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस आज पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहे. (Maharashtra Politics)

 

आज दिल्लीत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटावर (Shinde Group) सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणी ही 8 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत असलेल्या शिंदे सरकारचा (Shinde Government) कार्यक्रम खोळंबला आहे.

 

मंत्रिमंडळ विस्तार लांबला
शिवसेना कुणाची या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये आजची सुनावणी पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिला नाही. यावेळी शिवसेनेच्या चिन्हाबद्दल (Shivsena Election Symbol) कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला (Election Commission) दिले आहेत. तसेच दोन्ही गटांच्या लिखित युक्तिवादावर निर्णय घेतला जाईल, असंही कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लांबणीवर टाकला. (Maharashtra Politics)

भाजपकडून कोणाला संधी मिळणार?
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन (Girish Mahajan), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe), बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan), नितेश राणे (Nitesh Rane)

 

शिंदे गटाकडून कोणाला संधी मिळणार?
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), उदय सामंत (uday Samat), दादा भुसे (Dada Bhuse),
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar),
संदीपान भुमरे (Sandipan Bhumare), संजय शिरसाट (Sanjay Shirsat)

 

अपक्षांपैकी बच्चू कडू (Bachu Kadu) किंवा रवि राणा (Ravi Rana) यांना संधी मिळू शकते, यात बच्चू कडू यांचं पारडं जड आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | eknath shinde chief minister shindes health deteriorated while deputy chief minister fadnavis left for delhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊतांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढला

 

Shinde Government | शिंदे सरकारचा मविआला आणखी एक धक्का, निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत

 

Pune Crime | एकीशी शरीरसंबंध दुसरीशी केला विवाह; जाब विचारणाऱ्या तरुणीला केली मारहाण