Ketki Chitale Police Custody | शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला तब्बल ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ketki Chitale Police Custody | मराठी अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबाबत फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट केली होती (Ketki Chitale Facebook Post). त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते (NCP Workers) आक्रमक झाले आणि तिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शनिवारी ठाणे पोलिसांनी (Thane Police) केतकीला (Ketki Chitale Arrest) अटक केली होती. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

शरद पवारांविरूध्द फेसबुकवर पोस्ट करणं केतकी चितळेला चांगलंच महागात पडलंय. ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश वी. वी. राव – जडेजा (Judge V.V. Rao – Jadeja) यांच्यासमोर केतकी विरूध्द असलेल्या खटल्याची सुनावली झाली.

 

आज रविवार असल्याने केतकीला सुट्टीच्या कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी सरकार पक्षानं आपली बाजू मांडली.
केतकीने वकील घेतला नाही. तिनं स्वत: न्यायालयात युक्तिवाद केला. ठाण्याच्या गुन्हे शाखेने (Thane Police Crime Branch) न्यायालयात (Thane Court) तिची 5 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने युक्तिवाद ऐकुन घेतल्यानंतर केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

Web Title :- Ketki Chitale Police Custody | ketki chitale police custody till may 18 for posting post on facebook against ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Andrew Symonds Dies In Car Crash | 46 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यु

 

Vitamin Rich Foods | केस, नखे आणि त्वचेसाठी अप्रतिम आहेत ‘या’ 8 गोष्टी; आहारात करा समाविष्ट, जाणून घ्या

 

Pune PMC Action On Sarasbaug Chowpatty | सारसबाग चौपाटीवरील खाद्यपदार्थांचे 53 स्टॉल सील, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई