Maharashtra Lockdown | राज्यात वीकेंड Lockdown, नाईट कर्फ्यू लागणार का? राजेश टोपे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – Maharashtra Lockdown | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (Maharashtra Government) राज्यात कडक निर्बंध (Restrictions) लावण्याच्या तयारीत आहे. दैनंदिन वाढणा-या बाधिताच्या संख्येने राज्याला चिंता लागली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) किंवा नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागणार का? यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे.

‘ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत आज (गुरूवारी) आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) हे देखील उपस्थित होते. त्यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘राज्यात लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूबाबत चर्चा झाल्या आहेत. पण याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे निर्णय घेतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा होणे अजुन बाकी आहे,’ असं ते म्हणाले. (Maharashtra Lockdown)

पुढे राजेश टोपे म्हणाले, ‘शरद पवारांनी आरोग्य विभागाकडून संपूर्ण स्थितीची आढावा घेतला. यात आमच्याकडून त्यांनी काय करावं? काय करु नये? याची माहिती घेतली. त्यांच्या मागणीनुसार आज संध्याकाळी शरद पवारांना आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात येईल. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची रोज सकाळी 7 वाजता फोनवरुन डिटेल चर्चा होते. त्यांच्यात राज्यातील परिस्थितीबाबत माहितीची देवाण-घेवाण होत असते.

 

Web Title :-  Maharashtra Lockdown | weekend lockdown night curfew will there be in maharashtra health minister rajesh tope clear it

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला मोक्काच्या गुन्ह्यात 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी, चतुःश्रृंगी पोलिसांनी केली होती अटक

 

Tax Saving | 10 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 1 रुपयाचाही भरावा लागणार नाही टॅक्स, जाणून घ्या काय करावे

 

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर