नाशिक : उस्मानिया टॉवर परिसरात छापे टाकून ३२ लाख रुपयांचा गुटखा जप्त

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – अन्न व औषध विभागाच्या पथकाने उस्मानिया टॉवर परिसरात मंगळवारी सायंकाळी छापे टाकून ३२ लाख रुपयांचा अवैधरित्या प्रतिबंधक गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी दस्तगीर उस्मान शेख (वय. ४१, रा. उस्मानिया टॉवर) याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कथडा भागातील उस्मानिया टॉवर भागात अवैधरीत्या प्रतिबंधक गुटख्याचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध विभागास मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. २४) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली. पथकाने संशयित दस्तगीर शेख याची चौकशी करत, केलेल्या गुदामाच्या पाहणीत अवैध साठा आढळून आला.

३२ लाखांचा गुटखा जप्त

अन्न व औषध पथकाला ३१ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंध असलेला विमल पान मसाला आणि व्हीआय सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात २७ लाख ७६ हजार ८४० रुपयांचा विमल पानमसाला त्याचसोबत तीन लाख ९४ हजार ७६० रुपयांचा व्हीआय सुगंधित तंबाखूचा समावेश आहे.