हळदीच्या मदतीनं घरच्या घरीच काढू शकता चेहऱ्यावरील नको असलेले केस ! जाणून घ्या कसं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुम्ही चहेऱ्यावरील नको असलेले केस घरीच काढू शकता. खास करून महिलांना यासाठी पार्लरला जावं लागतं. आता तुम्ही हळदीचा वापर करूनही चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता. जाणून घेऊयात कसं ते.

साहित्य

– अर्धा कप किंवा गरजेनुसार थंड दूध
– अर्धा कप किंवा गरजेनुसार बेसन
– 1 चमचा किंवा बेसनाच्या प्रमाणानुसार हळद
– 1 चमचा किंवा प्रमाणानुसार मीठ

‘अशी’ तयार करा हळदीची पेस्ट

– एका वाटीत थंड दूध घ्या.
– यात बेसन टाकाट
– यात मीठ टाका
– यात हळद टाका.
– हे मिश्रण नीट एकत्र करा
– तुमची ही पेस्ट आहे.

कशी लावाल पेस्ट ?

– हळदीची ही तयार पेस्ट आता नको असलेले केस असणाऱ्या भागावर लावा
– पेस्ट लावल्यानंतर सर्क्युलर मोशनमध्ये काही वेळासाठी मसाज तरा.
– 15-20 मिनिटे ही पेस्ट तशीच राहू द्या.
– 20 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवून टाका.

याकडे लक्ष द्या

– जर तुम्हाला हळदीची अॅलर्जी असेल तर हे लावू नका
– पेस्ट लावण्याआधी चेहऱ्यावर किंवा हातावर ही पेस्ट थोडीशी लावून हे चेक करा जळजळ, आग होत तर नाहीये ना किंवा खाज तर येत नाहीये ना. जर अॅलर्जी आहे असं वाटत असेल तर हा उपाय करू नका.
– ही पेस्ट लावल्यानंतर जर चेहऱ्यावर पिवळे डाग दिसत असतील तर एका कॉटनवर अॅप्पल व्हिनेगर ते डाग स्वच्छ करा.