Indian Pension System | पेन्शन सिस्टमबाबत मोठी बातमी, जाणून घ्या निवृत्तीनंतरच्या नियोजनांवर काय सांगतो अहवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Indian Pension System | भारताची पेन्शन प्रणाली (Indian Pension System) 43 व्यवस्थांच्या रँकिंगमध्ये (overall index ranking) 40व्या स्थानावर आहे. तर पेन्शनच्या बाबतीत योग्य लाभाशी संबंधीत पर्याप्तता उप-निर्देशांकाच्या (adequacy sub-index) बाबतीत खालच्या स्थानावर आहे. मंगळवारी जारी मर्सर सीएफए जागतिक पेन्शन निर्देशांकात (MCGPI) हे सांगण्यात आले आहे. यानुसार देशात सेवानिवृत्तीनंतर (Retirement) पर्याप्त उत्पन्न ठरवण्याबाबत पेन्शन प्रणाली चांगली बनवण्यासाठी धोरणात्मक दुरूस्तीची गरज आहे.

रिपोर्टनुसार, भारतात सामाजिक सुरक्षेची कक्षा मजबूत आणि योग्य नसल्याने कार्यबळास पेन्शनच्या व्यवस्थेसाठी स्वता बचत करावी लागते.
यामध्ये म्हटले आहे की, देशात खासगी पेन्शन व्यवस्थेत कव्हरेज केवळ सहा टक्के आहे. 90 टक्केपेक्षा जास्त मनुष्यबळ असंघठित क्षेत्रात आहे.
यामुळे मोठ्या संख्येत मनुष्यबळास पेन्शन बचतीच्या कक्षेत आणण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

सर्व्हेनुसार, विश्लेषणात सहभागी देशांत भारताचे एकुण निर्देशांक मूल्य 43.3 होते. निर्देशांक अंतर्गत तीन-उप निर्देशांक…पर्याप्तता, स्थिरता आणि उपयुक्ततेच्या (अ‍ॅडिक्वेसी, सस्टेनेबिलिटी अणि इंटिग्रिटी) आधारावर पेन्शन व्यवस्थेची मजबूती अधोरेखित केली आहे.
तिनही उप निर्देशांकांना…पर्याप्तता, स्थिरता आणि उपयुक्तता…च्या बाबतीत भारताला अनुक्रमे 33.5, 41.8 आणि 61 अंक मिळाले आहेत.

Adequacy sub-index प्रदान करण्यात येत असलेल्या लाभाची पर्याप्तता दर्शवतो. तर स्थिरता उप-निर्देशांक हे सांगतो की, सध्याची प्रणाली भविष्यात लाभ प्रदान करण्यात सक्षम आहे.
तर उपयुक्तता उप-निर्देशांकात अनेक कायदेशीर गरजांचा समावेश आहे ज्या, प्रणालीची संचालन व्यवस्था आणि कार्याला प्रभावित करतात.

 

Web Title : Indian Pension System | indian pension system ranked 40th among 43 systems mercer study marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gita Gopinath | IMF चं ‘चीफ इकॉनॉमिस्ट’ पद सोडणार गीता गोपीनाथ, Harvard University मध्ये परतणार

Beach Vacation Pictures | ब्लॅक बिकीनीमध्ये 42 च्या बिपाशाचा दिसला एकदम कडक लूक, पतीसोबत दिली रोमँटिक पोज

Pune Crime | कोकणात आंब्याची बाग, 1 बीएचके फ्लॅटचे स्वप्न दाखवून फसवणूक; पुण्यातील बाप-लेकासह तिघांना अटक