Supreme Court | उमेदवारांची निवड निश्चित झाल्यानंतर 48 तासात गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करा – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सर्वच राजकीय पक्षांना एक महत्वाचा आदेश दिला आहे. उमेदवारांची निवड निश्चित झाल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राजकारण वाल्यांचे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी या उद्देशाने सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) याबाबत आदेश जारी केला आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आरएफ नरीमन (Judge RF Nariman), न्या. भूषण गवई (Judge BR Gavai) यांनी 13 फेब्रुवारी 2020 च्या निकालामध्ये काही बदल केले आहेत. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेब्रुवारी महिन्यामध्ये बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंधित आदेश दिला होता. उमेदवारांची निवड झाल्यानंतर 48 तासांच्या आत अथवा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन आठवड्यापूर्वी स्वत:बद्दलची सविस्तर माहिती जाहीर करावी, असं न्यायालयाने आदेशात सांगितलं होतं.

या दरम्यान, सुप्रीम कोर्टात राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह निलंबित
करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी हे
राजकीय पक्ष जाहीर करत नाहीत, असा त्यांचा मुद्दा होता. सुप्रीम कोर्टाच्या फेब्रवारी 2020 च्या आदेशाचे राजकीय पक्ष पालन करत नसल्यामुळे त्यांच्याविरोधात अवमान केल्याची कारवाई करावी याबाबत याचिकाकर्त्याची मागणी (Demand) होती.

हे देखील वाचा

Shriguru Balaji Tambe | आयुर्वेदाचार्य श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे 81 वर्षी निधन

State Board CET 2021 | अकरावीसाठीची CET परीक्षा रद्द, 10 वीच्या गुणांवर प्रवेश; हाय कोर्टाचे निर्देश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Supreme Court | parties must publish criminal records of candidates within 48 hours of selection supreme court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update