Chhagan Bhujbal | उड्डाणपूल उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने छगन भुजबळ ‘नाराज’; पालकमंत्री म्हणाले…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक शहरातील (Nashik City) वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता के के वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल दरम्यान 2.6 किमी 457 कोटी रुपयांचा उड्डाणपुल (Flyover) तयार करण्यात आला आहे. रविवारी शिवसेना खासदार हेमंत गोडसेंच्या (Shivsena MP Hemant Godse) हस्ते या उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी तूफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मात्र छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना या कार्यक्रमात बोलवले नाही. या कार्यक्रमास निमंत्रण न मिळाल्याने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये होते. नाशिकच्या उड्डाणपुलाच्या उदघाटनाची फित त्यांच्या हस्तेही कापता आली असती. इतकी घाई का केली माहित नाही, मुळात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari), इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत सोहळा व्हायला हवा होता. खासदार हेमंत गोडसेंकडून नाशिकमध्ये असतांनाही त्यांना निमंत्रण दिल गेलं नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.

 

तूफान गर्दी, नियम धाब्यावर

उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी तूफान गर्दी केली होती.
यावेळी खासदार हेमंत गोडसेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क ही नव्हता. काल वरुण सरदेसाई (Varun Sardesai) तर आज हेमंत गोडसेंच्या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम (Corona rules) धाब्यावर बसवले गेले. त्यामुळे शिवसेना नेत्यांकडूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जातीय. दरम्यान या संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांना विचारले असता उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली असं अजब उत्तर त्यांनी दिलं. वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल रविवार पासून खुला करण्यात आला आहे.

Web Title :- chhagan bhujbal unhappy on flyover inauguration program nashik news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Marathi Actor | ‘या’ मराठी अभिनेत्याची मुलगी बॉडीबिल्डिंग क्षेत्रात कमावतेय नाव

Jalgaon Crime | तब्बल 8 महिन्यानंतर आत्महत्येमागील कारण आले समोर

Maharashtra BJP | महाराष्ट्रातील भाजपची दिल्लीत खलबते; चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ फडणवीस, दरेकरही दिल्ली दरबारी