Pune Mcoca Court | बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील मोठी अपडेट, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mcoca Court | राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे Raviraj Taware baramati (माळेगाव बु, बारामती) यांच्यावरील गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे Jaideep Dilip Taware यांना पुणे येथील मोक्का न्यायालयाने (Pune Mcoca Court) आज जामीन मंजूर केला. रविराज तावरे यांनी दिलेल्या जबाबावरून तपास अधिकारी व उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर (Sub Divisional Police Officer Narayan Shirgaonkar) यांनी महिन्यापूर्वी जयदीप यांना मोक्कांतर्गत अटक केली होती.

मात्र गोळीबार प्रकरणात जयदीप तावरे यांचा सहभागी आढळून न आल्याने तसा अहवाल संबंधित तपास अधिकारी शिरगावकर यांनी मोक्का न्यायाधीश जे. पी. अगरवाल (Mocca Judge J. P. Agarwal) यांच्यासमोर सादर केला. अ‍ॅड. हर्षद निंबाळकर (adv harshad nimbalkar), अ‍ॅड. धैर्यशिल जगताप (adv dhairyasheel jagtap), अ‍ॅड. सचिन वाघ (Adv Sachin Wagh) यांनी जयदीप तावरे यांच्या बाजूने केलेला युक्तवाद न्यायालयाने ग्राह्य धरून जामीन मंजूर केला.

जयदीप तावरे (Jaideep Taware) यांना जामीन मिळाल्याची बातमी समजल्यानंतर माळेगाव मध्ये त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची अतषबाजी केली.
यावेळी माळेगावचे माजी संचालक दिपक तावरे (Deepak Taware) यांनी म्हटले की,
रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार ही गोष्ट निंदनिय आहे.
याप्रकरणी सुरवातीला पकडलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली,
त्याबाबत कोणाचेच दुमत नव्हते.
परंतु राजकीय आकसापोटी जयदीप तावरे यांना अटक झाल्याने गावात विनाकारण तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी निपक्षपाती गोळीबार प्रकरणाचा तपास केल्यामुळेच जयदीपला जामीन मंजूर होण्यास मदत झाली, याचे समधान वाटते.

31 मार्च रोजी झालेल्या या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी प्रथम 4 आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करून अटक केली होती.
प्रशांत पोपटराव मोरे, टॉम उर्फ विनोद पोपटराव मोरे,
राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव (सर्व रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती)
हे अजूनही अटकेत आहेत तर एका अल्पवयीन मुलाला जामिनावर सोडले आहे.

Web Title :- Pune Mcoca Court | former sarpanch Jaideep Dilip Taware granted bail in malegaon shooting case of ncp activist raviraj taware

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashmi Shukla | फोन टॅपिंगबाबत वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा न्यायालयात मोठा गौप्यस्फोट

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,857 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Narayangaon Crime | शेजाऱ्यांच्या भांडणाला वैतागून महिलेची आत्महत्या, नारायणगावातील दुशिंग कुटुंबातील 5 जणांना अटक झाल्याने प्रचंड खळबळ