Pune Crime Branch Police | RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला मदत करणार्‍या अ‍ॅड. मोरे यांना अटक, गुन्हे शाखेनं केली कारवाई

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – खंडणी (Ransom), फसवणूक (Cheating) आणि मोक्क्याच्या Mokka (MCOCA Action) गुन्ह्यात फरार (Abscond) असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे (RTI Activist Ravindra Barate pune) याला मदत करणे एका वकिलाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी अ‍ॅड. सुनील मोरे (Adv. Sunil More) यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune crime Branch police) अटक (Arrest) केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी फसवणुकीच्या कटात मदत केल्याचा ठपका ठेवत बोऱ्हाटेच्या पत्नी व मुलासह तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune crime Branch police) पथाने अटक केली आहे. संगीता रविंद्र बऱ्हाटे (Sangeeta Ravindra barate) (वय-55), मुलगा मयूर रविंद्र बऱ्हाटे (Mayur Ravindra Barate) आणि पितांबर गुलाब धिवार (Pitabar Gulab Dhiwar) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. pune crime branch police arrest advocate sunil more who helps absconded rti activist ravindra barate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे शहरातील (Pune City) विविध नागरिकांकडे खंडणी मागणे, फसवणूक आणि जमिन बळकाविण्याच्या 12 गुन्ह्यामध्ये रवींद्र बऱ्हाटे (Ravindra Barate) फरार आहे.
त्याच्यासह तथाकथीत पत्रकार देवेंद्र जैनही (Journalist Devendra Jain) फरार आहे.
त्यापैकी तीन गुन्ह्यामध्ये बऱ्हाटेविरोधात मोक्कानुसार कारवाई Mokka (MCOCA Action) करण्यात आली आहे.
बऱ्हाटे टोळीमध्ये (Barate Gang) सांगलीचे संजय भोकरे (Sanjay Bhokare Sangli), बडतर्फ पोलीस शैलेश जगताप (Dismissed Police Shailesh Jagtap) याचाही समावेश आहे.
मागील एक वर्षापासून रवींद्र बऱ्हाटे हा पोलिसांना गुंगारा देत आहे.

रवींद्र बऱ्हाटे याने दोन वेळा फेसबुकवर (Facebook) व्हिडिओ पोस्ट करुन पुणे पोलिसांवर (Pune Police) गंभीर आरोप केले होते.
संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्यास मदत करणाऱ्या पितांबरला देखील पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune crime Branch police) अटक केली आहे.
प्राथमिक तपासात पत्नीसह मुलाचा देखील यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले होते.
त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune crime Branch police) बुधवारी संगीता बऱ्हाटेला (Sangeeta Ravindra barate) अटक केली होती. त्यानंतर मुलगा मयुर याला अटक केली.
आता याप्रकरणी प्राथमिक चौकशीत अ‍ॅड. सुनील मोरे (Adv. Sunil More) यांनी देखील रवींद्र बऱ्हाटेला मदत केल्याचे दिसून आले आहे.
त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अ‍ॅड. सुनील मोरे यांना अटक (Arrest) केली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी सचिन गुलाब धिवार (Sachin Gulab Dhiwar)याचा भाऊ पितांबर (Pitabar Gulab Dhiwar) याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
बऱ्हाटे फरार झाल्यापासून पितांबर धिवार हा रवींद्र बऱ्हाटेच्या संपर्कात होता, असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
पितांबर याने व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल केले होते.
सर्व व्हिडिओ व ऑडीओ तयार करु प्रसारीत करण्याच्या कामात पितांबर याने बऱ्हाटे याला मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
त्यानुसार त्याला अटक केली आहे.

Web Title : pune crime branch police arrest advocate sunil more who helps absconded rti activist ravindra barate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यात आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक; जोशी बाप-लेकाला अटक

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA च्या वाढी अगोदर मिळाली ‘ही’ भेट

MLA Gopichand Padalkar | आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात