SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! बॅंकेने कामकाजाच्या वेळेत केला बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SBI बॅंकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. SBI ने आपल्या कामाच्या वेळेत बदल केले आहेत. यापूर्वी SBI ब्राँच सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होत्या. आता या वेळेत आणखी दोन तास वाढवले आहेत. म्हणजेच आता बँक संध्याकाळी 4 वाजेपर्यत सुरु राहणार आहे. काल मंगळवार (दि. 1) पासून हा नियम लागू केला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 10 ते 4 या वेळेत बॅकेसंबधीची कामे करता येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेने कामाची वेळ कमी केली होती. परंतु आता कोरोनाची संख्या घटत असल्याने कामाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याची माहिती दिली आहे. 1 जूनपासून सर्व एसबीआय ब्राँच 10 ते 4 सुरु राहतील असे ट्विटद्वारे सांगितले आहे. तसेच SBI ने आपल्या ग्राहकांसाठी नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. यात पैसे काढण्याच्या नियमांबाबत सांगितले आहे. या नव्या नोटिफिकेशननुसार, बँकेकडून आता होम ब्राँच नसलेल्या इतर ब्राँचमधून रोख पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. ग्राहकांना Non-Home ब्राँचमधून 25000 रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. चेकद्वारे Non-Home ब्राँचमधून कॅश काढण्याची मर्यादा 1 लाखांपर्यंत आहे. तसेच थर्ड पार्टी अर्थात ज्याला चेक दिला आहे, त्यांच्यासाठी कॅश काढण्याची मर्यादा वाढवून 50 हजार रुपये इतकी केली आहे. हा नियम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू होणार आहे.

Also Read This : 

‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे

DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक

दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या

Maharashtra : राजघराण्यातील सदस्याला पैशांसाठी केलं ब्लॅकमेल, एक लाखाची खंडणी घेताना काँग्रेसचा नेता अटकेत