kolhapur News : चुलत्याच्या निधनाच्या धक्क्याने पुतणीचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – चुलत्याच्या निधनाच्या धक्काने पुतणीचाही मृत्यू झाला. शनिवारी (दि. 3) उदगाव (ता. शिरोळ) येथे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अर्पिता अनिल टारे (वय 17 रा. उदगाव ता. शिरोळ) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपूर्वी सख्खे चुलत काका सुनील बाबूराव टारे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सांगली येथे उपचारासाठी दाखल केले होते. काकांना बघण्यासाठी अर्पिता कुटुंबीयांसह मंगळवारी रुग्णालयात गेली होती. काकांना रुग्णालयात पाहून अर्पिताला धक्‍का बसला होता. गुरुवारी (दि.1) सुनील टारे यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर अर्पिताचा पुन्हा रक्‍तदाब वाढला. त्यामुळे तिलाही उपचारासाठी सांगली येथे दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी अर्पिताचे निधन झाले. अर्पिताच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.