हृतिक रोशननं BMC कर्मचाऱ्यांसाठी खरेदी केले ‘मास्क’, डॉगसोबत फोटो शेअर करत चाहत्यांना केलं ‘हे’ आवाहन !
पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार हृतिक रोशननं देशात सुरू असलेल्या संकटकाळात सर्वात मुलभूत काळजीवाहकांची सुरक्षा निश्चित करण्यावर भर दिला आहे. बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी मास्क खरेदी करून हृतिकनं एक मोठं पाऊल टाकलं आहे. गुरुवारी हृतिकनं ट्विट केलं की, “अशा काळात आपण शक्य ती प्रत्येक गोष्ट केली पाहिजे ज्यामुळं आपल्या समाज आणि शहरातील मुख्य काळजीवाहकांची सुरक्षा निश्चित केली जाईल. मी बीएमसी कर्मचारी आणि इतर काळजी वाहकांसाठी एन 95 आणि एफएफपी 3मास्क खरेदी केले आहेत.” हृतिकनं मंत्री आदित्य ठाकरे यांचेही आभार मानले आहेत.
In times such as these, we must do whatever we can to ensure the safety of the most fundamental caretakers of our city and society. I have procured N95 and FFP3 masks for our BMC workers and other caretakers… 1/2
— Hrithik Roshan (@iHrithik) March 26, 2020
हृतिक पुढे म्हणतो, “या महामारीला आळा घालण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र सरकारचं समर्थन करण्याची संधी दिल्याबद्दल मी आदित्य ठाकरे यांचे आभार मानतो. आपल्या परीनं शक्य त्या गोष्टी करणं हे आपलं कर्तव्य आहे.” असंही तो म्हणाला.
Thankful to you @iHrithik for your assistance and support ☺️🙏🏻
Let’s defeat corona.
For all those who are wanting to help, most important help you can be of:
1) Stay Home
2) wash your hands
3) can help sitting at home, via Govt/ Orgs working to support others. https://t.co/dWxNnySsP4— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 26, 2020
हृतिकनं आजच त्याच्या कुत्र्यासोबत फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे.
The real life heroes with masks. Saving lives. Let's be kind & cooperate with everyone who is out there, to ensure we are home safe. https://t.co/1bbPtqnW2F
— Hrithik Roshan (@iHrithik) March 26, 2020
हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा वॉर या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता.
Zane wants to tell you to stay home like his daddy . .
.#stayhome and #loveyourdog #resilience #followtherules #coexist pic.twitter.com/9s2BYvWBWx— Hrithik Roshan (@iHrithik) March 27, 2020