पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने शहरातील निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 215 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये (Pimpri Corona) दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 215 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 65 हजार 989 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 233 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 60 हजार 797 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 833 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 02 रुग्ण शहरातील आहेत.
तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4359 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी (दि.8) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 8008 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 11 लाख 67 हजार 768 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title :- Pimpri Corona | 215 new corona patients in Pimpri Chinchwad today
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Unlock | पुण्यातील निर्बंध शिथील? उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना Live Video