नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सामान्यपणे लोक कब्रस्तानचे घेतले तरी घाबरतात. विशेष करून कोरोना काळात कब्रस्तान मृतदेहांनी भरलेले आहे. या दरम्यान सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तीन मुले कब्रस्तानमध्ये साबण लावून आंघोळ करताना दिसत आहेत. कुणी विचारही केला नसेल की कब्रस्तानमध्ये असे दृश्य पहायला मिळू शकते. हा व्हिडिओ लपून रेकॉर्ड करण्यात आला आहे आणि सोशल मीडियावर वायरल करण्यात आला.
https://www.instagram.com/p/COAptu1DhcE/?utm_source=ig_web_copy_link
भगवी लुंगी घालून आंघोळ करताना दिसले
व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. भगवी लुंगी घातलेली तीन मुले व्हिडिओत दिसत आहेत. कब्रस्तानमध्ये मुतांच्या कबरीजवळ तिघेही साबण लावून आंघोळ करताना दिसले. याचे कारण काय आहे, हे समजलेले नाही. तिघेही सहजपणे कबरींच्या मधोमध आंघोळ करत आहेत.
भूतांशी करत होते का कॉन्टॅक्ट ?
तिघांना आंघोळ करताना पाहून कुणीतरी गुपचूप हा व्हिडिओ बनवला आहे. सोशल मीडियावर अनेक लोकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. काहींचे म्हणणे आहे की, ही काही तरी स्पिरिचुअल अॅक्टिव्हिटी आहे. म्हणजे हे लोक भूतांशी कॉन्टॅक्ट करत होते. मात्र, अजूनपर्यंत याचे योग्य कारण समलेले नाही.