नवी दिल्ली : दिल्ली सरकारने त्या मजूरांना मोठा दिलासा दिला आहे, जे सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी लेबर डिपार्टमेंटचे उंबरठे झिजवत असतात. अशा मजूरांना आता आफिसेसच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. त्यांचे काम आता घरबसल्या होईल. दिल्लीचे डेप्युटी सीएम मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, काही दिवसापासून ते पहात आहेत की, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मजूर लेबर डिपार्टमेंटमध्ये सकाळपासूनच येतात. कारण जोपर्यंत लेबर डिपार्टमेंट मजूरांचे रजिस्ट्रेशन होत नाही, तोपर्यंत त्यांना सरकारी स्कीमचा फायदा मिळत नाही. अशा मजूरांना आता एका कॉलवर ही सुविधा मिळेल.
कॉल केल्यानंतर घरी येणार डाटा घेण्यासाठी
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी माहिती देताना सांगितले की, आता मजूरांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी लेबर डिपार्टमेंटमध्ये जावे लागणार नाही. यासाठी दिल्ली सरकार डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेंतर्गत मजूरांना रजिस्ट्रेशन करेल. मजूरांना यासाठी केवळ एक फोन कॉल करावा लागेल. यानंतर सरकारचा प्रतिनिधी त्यांच्याकडे जाईल, आवश्यक कागदपत्र जमा करेल आणि नंतर 6-7 दिवसात त्यांना कॉल करून सांगितले जाईल की, त्यांचे सर्टिफिकेट तयार झाले आहे. आणि ते पुन्हा यावरून सरकारी योजनांचा फायदा घेऊ शकतात. या रजिस्ट्रेशननंतर मेडिकल सुविधा, घरात मुलांच्या लग्नांसाठी पैसे किंवा एखादी दुर्घटना झाल्यास सरकारची मदत मिळेल.
घरी असे होईल रजिस्ट्रेशन
– 1076 नंबरवर फोन करावा लागेल.
– दिल्ली सरकारच्या डोअर स्टेप डिलेव्हरी टीमचा सदस्य त्या बांधकाम मजूराच्या घरी येऊन कागदपत्र घेऊन फार्म भरेल. सोबतच कागदपत्रे आणि मजूराचा फोटो ऑनलाइन अपलोड करेल.
– अर्जाला ऑनलाइन स्वीकृती मिळेल.
– बांधकाम मजूर आपले प्रमाणपत्र इंटरनेटने डाऊनलोड करू शकतो. अन्यथा चार पाच दिवसात त्याच्या घरी पाठवले जाईल.
कोण-कोणत्या मजूरांना मिळणार सुविधा
सुतार, बार बायंडर, बेलदार, हमाल, मजूर, घर बनवणारे, चौकीदार, काँक्रीट मिश्रण करणारे, क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, फीटरमॅन, लोहार, सफेदी करणारे पेंटर, प्लंबर, पीओपी लेबर, पंप ऑपरेटर, दगडी बांधकाम करणारे किंवा दगड फोडणारे, हे योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.