बहुजननामा ऑनलाईन
बँक अकाऊंटच्या डिटेल चुकीच्या असणे : पीएफ क्लेमचे पैसे त्याच बँक खात्यात क्रेडिट केले जातात, जे ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये नोंदले आहे. यासाठी क्लेम करताना अकाऊंटच्या डिटेल्स लक्षपूर्वक भरा. जर चूकीचा अकाऊंट नंबर किंवा अन्य खात्याचा नंबर दिला तर अर्ज रिजेक्ट होईल.
KYC पूर्ण नसेल :
जर अकाऊंट होल्डरच्या केवायसी पूर्ण नसतील तर अॅप्लीकेशन रद्द होऊ शकते. तुमच्या केवायसी डिटेल्स पूर्ण हाण्यासह व्हेरिफाय सुद्धा होणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण आणि व्हेरिफाय आहेत किंवा नाही, याची तपासणी तुम्ही मेंबर अकाऊंटमध्ये करू शकता.
जन्म तारीख चुकीची असणे :
ईपीएफओमध्ये नोंदलेली जन्म तारीख आणि कंपनीच्या रेकॉर्डवरील जन्म तारीख यामध्ये तफावत असेल तरीसुद्धा तुमचा अर्ज कॅन्सल होऊ शकतो. ईपीएफओच्या 3 एप्रिलच्या सर्क्युलरनुसार रेकॉर्डमध्ये नोंदलेली जन्म तारीख दुरूस्त करणे तसेच यूएएन आधारशी जोडण्याच्या नियमात शिथिलता आणली आहे. आता जन्मतारीख 3 वर्षापर्यंत दुरूस्त करू शकता.
अकाऊंटशी युएएन लिंक असावे :
याशिवाय तुमचा अकाऊंट नंबर युएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) शी लिंक्ड असावा. जर तुमचे अकाऊंट लिंक नसेल तरी पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात. याशिवाय, ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये नोंदलेला आयएफएससी नंबरसुद्धा योग्य असावा.