बहुजननामा ऑनलाइन टीम : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्ही ग्रॅजुएट झाले असाल त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाने पदवीधरांसाठी व्हेकन्सी उपलब्ध करुन दिली आहे. यानुसार डेपोटी कलेक्टर, महसूल विभाग, जनसंपर्क आणि वित्त विभाग समवेत अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण ३३० पदांसाठी भरती केली जाणार आहे.
जे इच्छुक असाल त्यांनी mppsc.nic.in आणि mppsc.com वर जाऊन अर्ज भरू शकता. १२ डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. १२ जानेवारी रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परिक्षा दोन भागांमध्ये घेतली जाईल यानुसार एका भागात जनरल नॉलेज तर दुसऱ्यामध्ये फिजिकल टेस्ट घेतली जाईल. लेखी परिक्षा पास होणारेच फिजिकल टेस्टसाठी ग्राह्य धरले जातील.
वयोमर्यादा किती असावी
कमीत कमी वय २१ आणि जास्तीत जास्त ४० वयोमर्यादा असावी.
यासाठी एवढे आहे शुल्क
उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५० रुपये भरावे लागतील
असा अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटवर mppsc.nic.in जा
होमपेजवरील अर्जावर क्लिक करा
त्यानंतर state services exam वर क्लिक करा
रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करा
रजिस्ट्रेशन आयडीच्या सहाय्याने लॉगिन करा
अर्ज भरुन कागदपत्रांची पूर्तता करा
शुल्क भरून अर्ज जमा करा
एवढा पगार असेल
या श्रेणीमध्ये निवड असलेल्या तरुणांना 15,800 ते 39,100 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. तर 5,400 रुपये ग्रेड पे म्हणून दिले जातील. तसेच तिसऱ्या वर्गात निवड झालेल्यांना 9,300 रुपये ते 34,800 रुपये दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे 3,600 रुपये ग्रेड पे दिले जाणार आहे.
Visit : bahujannama.com