बहुजननामा ऑनलाइन टीम – आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. आजच्या मंत्रिमडळ विस्तारात 26 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र खातेवाटप अजूनही करण्यात आले नाही. ठाकरे सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवे चेहरे दिसत आहे. या मंत्रिमडळ विस्तारात पहिल्यांदाच मंत्री झालेले त्याचबरोबर मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या तरुण आमदारांचा समावेश आहे. या तरुण आमदारांची नावे पुढीलप्रमाणे.
1. आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच वरळी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेना युवानेतेही आहे. ठाकरे घराण्यात आजपर्यंत कोणत्याच व्यक्तीने निवडणूक लढवली नाही. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच आमदार होणारे पहिले ठाकरे आहे. पिता आणि पुत्र मंत्रिमंडळात असल्याचे राज्याच्या राजकारणात पहिलीच वेळ आहे.
2. आदिती तटकरे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती यांना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. आदिती तटकरे या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक होते. पण, तरुणांना संधी देण्याच्या उद्देशामुळे आदिती तटकरे यांना मंत्रिपद दिले असण्याची शक्यता आहे. आदिती यांनी राष्ट्रवादी युवती संघटनेच्या माध्यमातून काम केले आहे. त्याचबरोबर 2017 पासून त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
3. प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरे हे विद्यमान नगराध्यक्ष असून ते जनतेतून निवडून आलेले राहुरीचे पहिले नगराध्यक्ष आहे. तनपुरे यांचे वडिल प्रसाद तनपुरे हे 25 वर्ष आमदार व एकदा खासदार राहिले आहे. त्याचबरोबर आई डॉ. उषा तनपुरे या नगराध्यक्ष राहिल्या आहे. प्राजक्त तनपुरे हे उच्चविद्याविभूषित असून ते मेकॅनिकल इंजिनिअरींग आहे. त्यांनी पुण्यामधून आपली इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. एम ई ही पदव्युत्तर पदवी त्यांनी अमेरिकेमधून घेतली आहे. ते पहिल्यांदाच राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहे.
4. शंकरराव गडाख
शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख हे नेवासा मतदारसंघातून विजयी झाले आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला. गडाख यांच्यारुपाने नेवासा विधानसभा मतदारसंघाला पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
5. राजेंद्र पाटील यड्रावकरकोल्हापूरमधील शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले आहे. त्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.