नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशच्या गाजियाबादमधील विकास प्राधिकरणाने नागरिकांना घरे देण्याबरोबरच आता पक्ष्यांना देखील घराची सुविधा दिली आहे. हि सिविधा प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांच्या घरापासून सुरु केली असून लवकरच अशा प्रकारची अनेक घरे बनविण्यात येणार आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे कारण याची सुरुवात गाझियाबाद विकास प्राधिकरणाच्या वीसीच्या निवासस्थानापासून झाली आहे.
गाजियाबाद विकास प्राधिकरणाने यासाठी त्यांच्या घराच्या आवारात पक्ष्यांसाठी ६० फ्लॅट तयार केले आहेत. यामध्ये ६० पक्षी राहू शकतील अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना राहण्यासाठी, खाण्याची आणि पोहण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळ संध्याकाळ यामध्ये दाणे टाकले जाणार आहेत. या घरांची उंची हि १५ फूट आहे. चारही बाजूने लोखंडी फ्रेम लावण्यात आल्या असून आतमध्ये लाकडाचा साचा तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, या घरांच्या निर्मितीसाठी २ लाख रुपये खर्च आला आहे. प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा कांचन वर्मा यांनी याविषयी सांगितले कि, राजस्थानमधील बिकानेर येथे देखील अशाप्रकारची घरे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे याठिकाणी देखील आम्ही हा निर्णय घेतला.
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ