मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गुजरातच्या महिला पोलीस कर्मचारीला बुधवारी सस्पेंड करण्यात आले आहे कारण ती पोलीस स्टेशनमध्ये बॉलीवूड गाण्यावर डान्स करते आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर तिला सस्पेंड करण्यात आले. मेहसाणा जिल्ह्यातील लंगणज पोलीस ठाण्यात लोक रक्षक दलामध्ये तैनात असलेल्या अर्पिता चौधरी नावाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने लॉकअप समोर डान्स करतांना शॉर्ट व्हिडीओ क्लिप बनवली. सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटामधील गाणे ‘तू ही तू’ वर डान्स करतांना दिसते आहे.
Lady police constable in Mahesana district of North Gujarat faces disciplinary action after her TikTok video shot in police station goes viral pic.twitter.com/7NWXpXCh8r
— DeshGujarat (@DeshGujarat) July 24, 2019
फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअपवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अर्पिता चौधरीचे टिकटॉक अकाउंट आहे. त्यावर ती नेहमी अॅक्टीव असते. तिचे आणखी देखील व्हिडीओ आहेत. @anaa_queen_2117 या नावाने तिचा यूजर आईडी आहे. अर्पिता चौधरीचे टिकटॉकवर १४ हजार पेक्षा जास्त फॅन्स आहेत. तिच्या व्हिडीओला आतापर्यंत ५५ हजार पेक्षा जास्त हार्टस मिळाले आहेत. टिकटॉकवर तिने आपल्या प्रोफाइलच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘अभी तो शुरू हुए हैं… पार्टी अभी बाकी है मेरे दोस्त.’
डीएसपी मनजीत वनजारा यांनी सांगितले की, ”अर्पिता चौधरी यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. ती ड्यूटीचा वेळी यूनिफॉर्म मध्ये नव्हती. दुसरी गोष्ट अशी की, लंगनाज गांव मधील पोलीस स्टेशन मध्ये ती आपला व्हिडीओ बनवत होती. पोलिसांनी स्वतः शिस्तीचे पालन करायला पाहिजे. आणि तिने शिस्तीचे पालन केले नाही त्यामुळे तिला निलंबित करण्यात आले आहे.