जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकी खुर्द येथे शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला चौघांनी  मारहाण करुन जखमी केले आहे.

या प्रकरणी मेघा शांताराम कड (२५, रा. वाकी खुर्द, घोडदरी वस्ती, ता. खेड) हिने फिर्याद दिली आहे. तर प्रणय कड आणि त्याचे तीन साथीदार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंडलिक कड हे शेतकरी जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा यांचे सासरे कुंडलिक आणि आरोपींचे शेतीच्या बांधावरून मागील काही दिवसांपासून भांडण सुरु होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी शनिवारी रात्री कुंडलिक यांना हाताने आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली. यामध्ये कुंडलिक जखमी झाले. याबाबत त्यांची सून मेघा यांनी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास चाकण पोलीस करत आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी

सावंतवाडीत स्वाभिमानच्या तालुकाध्यक्षांची गाडी जाळली

घरातील सर्वांचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी ५ लाखांचा ऐवज लुटला

पसंत नव्हता म्हणून ३ महिन्यातच पतीचा काढला काटा