ज्यांच्या चिरंजीवांनी आघाडीतून भाजप प्रवेश केला त्यांनी आघाडी धर्माबाबत बोलू नये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपवर ‘मुलं पळवणारी टोळी’ असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे. आघाडीबाबत आम्ही विचार करीत होतो असे यावेळी विखे-पाटील स्पष्ट केले होते मात्र त्यावरून ‘ज्यांच्या चिरंजीवांनी आघाडी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी आघाडीबाबत बोलू नये’, असं आव्हाड म्हणाले.

याबरोबरच ‘मुलच नाही तर नातवंडही पळवू’ असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केल्यानंतर आव्हाडांनी त्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. “शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवणार्‍यांचे अनेक नातू-पणतू वैचारीक आग ओकताहेत. ७० वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीत गांधींचे विचार मांडणारे आजोबा,पणजोबा, यांच्या कार्यकर्तृत्वावरती आयता ताव मारणारे तुप-लोणी खाऊन मदमस्त झालेले नातू-पणतू पळवणाऱ्यांना लखलाभ
पळवा रे पळवा!! ” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. त्यांनी यासंदर्भात आपल्या आधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे.

सामनाच्या अग्रलेखातून भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये असा सल्ला मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला दिला. त्यावर बोलताना पाळण्याची दोरीच तुमच्या हाती आहे, तुम्हीच ठरवा काय करायचं, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

फेसबुकवरील मैत्री ज्येष्ठ महिलेला पडली १२ लाखात

काँग्रेसला मोठा झटका : गांधी कुटुंबियांच्या ‘या’ निकटवर्तीयाचा भाजपमध्ये प्रवेश

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार मावळमधून जेरबंद

‘मीदेखील लैंगिक शोषणाची शिकार’ : दंगल गर्लचा धक्‍कादायक खुलासा

DELHI : काँग्रेसला मोठा झटका : गांधी कुटुंबियांच्या ‘या’ निकटवर्तीयाचा भाजपमध्ये प्रवेश