‘एकच वादा… सुजय दादा’; गरवारे क्लबमध्ये सुजय विखेंच्या नावाचाच गजर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात गेले काही दिवस उलट सुलट चर्चा रंगताना दिसत आहे. असे असताना आता सुजय पाटील यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित झाला आहे. अखेर सुजय विखे-पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. सुजय विखेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील वानखडे स्टेडियम मधील एमसीए पॅव्हेलियन येथे सुरु आहे.

या प्रवेश सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रवक्ता रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे उपस्थित आहेत. अहमदनगराच्या कार्यकर्त्यांनी सुजय विखेंच्या प्रवेशासाठी उपस्थिती लावली आहे. सुजय विखे सभागृहात आल्या आल्या त्यांच्या नावाचा जयघोष झाला. ‘एकच वादा, सुजय दादा’, सुजयदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, असा जयघोष होत होता. आज रात्री मुंबईत येण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते. त्यामुळे विखेंकडून मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनुश्री यांच्यासह उपस्थित होते.

दरम्यान, प्रवेशानंतर नगरचे आमदार आणि कार्यकर्ते भाजपसाठी प्रयत्न करतीलच तसेच हा सुजय विखे पाटीलही भाजपसाठी पूर्ण प्रयत्न करेल, असा शब्द सुजय यांनी दिला. तर ज्यांनी माझ्या संकटात माझी साथ दिली त्यांच्यासोबत आहे, असं म्हणत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच कुटुंबाविरोधात भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठी जबाबदारी आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.