नाते

मनात एक आशा
अंतरात ही ओढ ।
लागेना तुजवीण मज
काय कसे ते गोड ।
मनास हवी मनाची
एक तीच जोड ।
नको ताणू हे नाते
हट्ट तू जरासा सोड ।
Sanjay R.

वेड पावसाचे

होऊ नको तू वेडी
बरसेल हा पाऊस ।
भिजून त्यात चिंब
फिटेल सारी हाऊस ।

येईल ती सर धाऊन
सोबतीला असेल वारा ।
ठेव सांभाळून पदर
डोईवर पडतील गारा ।

बेधुंद मोकळे हे मन
होईल किती आनंद ।
फिटतील साऱ्या आशा
हवा वाटतो तो सुगंध ।
Sanjay R.

पाऊस

वेड पावसाचे मज
चिंब भिजते मन ।
ओघळतात धारा
ओले ओले तन ।

गरजते आकाश
दाटले त्यात घन
लखलखून जाते
वीज एक क्षण ।

होता ओली धरा
हिरवे होईल रण ।
वाटे वेचावा मज
पावसाचा येक कण ।
Sanjay R.

मन

मन मोकळं किती

कधी घेते ते गती ।

थांबेना क्षणभर

घाईच त्यास अती ।

Sanjay R.

शोध

शोधतो मीही आता
शब्दांच्या काय पल्याड ।
दोन अंतरात अंतर
दडले मन अल्याड ।
Sanjay R.

पंख

स्वप्नांनाही असतात पंख
येतो गगनात मी फिरून ।
सहजच मनाला वाटतं मग
बघावं तुझ्या हृदयात शिरून ।
Sanjay R.

येऊ दे आता पाऊस

येऊ दे आता पाऊस
मी पण घेईल भिजून ।
भयंकरच होतं उन
सारेच निघाले शिजून ।
जगभरात झाले रेकॉर्ड
पृथ्वी थकली तापून ।
पाण्याची झाली वाफ
नदीही गेली आटून ।
रडायला पण येत नाही
डोळेही गेलेत सुकून ।
येऊ दे रे पाऊस आता
मी पण घेईल भिजून ।
Sanjay R.

वेड प्रेमाचे

असे वेड हे बरे नाही
प्रेमाचे काही खरे नाही ।
शुद्ध हरपते भान हरपते
अस्तित्वच उरत नाही ।

वेडे पिसे होते मन
दिवसही सरत नाही ।
डोळ्यापुढे तेच ते
नजरही ढळत नाही ।

वेध लागतात कशाचे
तहान भूक उरत नाही ।
एकच एक विचार मनी
लक्ष कशात लागत नाही ।

धुंद असते डोक्यात सारी
ती ही जवाब देत नाही ।
नको नको ते प्रेम आता
माझा मीच उरत नाही ।
Sanjay R.

रात्र अंधारी

मनात नको दुःख
हवी थोडीशी आशा ।
बघ डोळ्यात माझ्या
सरेल साऱ्या निराशा ।

असू दे रात्र अंधारी
चांदण्या आहे सोबतीला ।
पौर्णिमेला चंद्र पूर्ण
नी काजवे अमावस्येला ।
Sanjay R.

माहेरचे अंगण

याद येते महेराची
लेक तू लाडाची ।
विसरू नको कधी तू
माया त्या आईची ।

बाप असेल कठोर
त्याच्याहून कोण थोर ।
मनात तुझा विचार
लाडाची तू ग पोर ।

रोज येते आठवण
तुझ्या भोवती मन ।
नको नको वाटतो
तुझ्या विना एक क्षण ।

सूने सुने झाले घर
झाले ओसाड आंगण ।
सूर कानात घुमतात
वाजे रुणझुण पैजण ।

लेक येता माहेराला
झुलते तुळस अंगणात ।
मोगरा ही बहरतो
दरवळ ही या मनात ।
Sanjay R.

लाल टिक्का

असू दे रंग कसाही
नाही गुलाबाचे वेड ।
मोगरा फुलतो मनात
काढावी तुझी छेड ।

नाही मनात माझ्या
गोऱ्या काळयाचा भेद ।
अंतरंग हवे सुंदर
नको बाकी अनुच्छेद ।

रंग गडद असा जो
नेहमीच पडतो फिक्का ।
शोभून दिसतो एक
कपाळी तो लाल टिक्का ।
Sanjay R.

रंग गुलाबी

गाल गुलाबी
ओठावर लाली ।
डोळ्यात काजळ
कुमकुम भाली ।
केसात गजरा
ठुमकत ती आली ।
रंभा म्हणूकी उर्वशी
भेट परीशी झाली ।
बघत राहिलो मी
नजर तिची खाली ।
ओशाळले मन
तीच हसली गाली ।
Sanjay R.

बाप माय

कशास रे तू करतो दुःख
क्षण सुखाचे जातील वाया ।

आई बापा विना इथे रे
करतोच कोण इतकी माया ।

माय माऊली ती मायेची
बाप घराची बनतो छाया ।

माय होते जेव्हा आधार
होतो बाप कुटुंबाचा पाया ।
Sanjay R.

अंत

होतात मलाही भास
मनात आहे ध्यास ।

नसते काहीच खास
करतो मीही प्रयास ।

सोसून धरतो त्रास
असतो हवा एक घास ।

अस्वस्थ करतो वास
धरतो सत्याची कास ।

आहे कठीण हा प्रवास
सरतात शेवटी श्वास ।
Sanjay R.